Marathi News » Photo gallery » Political photos » Sitaram das details know who is sitaram das in madhya pradesh accused of rewa circuit house rape case and his political connections
बलात्काराचा आरोप असलेला बाबा सीताराम दास साधासुधा नाही! SP, IAS आणि आमदारांचीही बाबावर मर्जी?
Who is Sitaram Das? : सर्किट हाऊसमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत या बाबानं अतिप्रसंग केला. बहाणा करत या मुलीला सर्किट हाऊसवर या बाबाचे भक्त घेऊन आले होते. तिथं या बंद खोली या बाबानं आपल्या भक्तांसोबत दारुचं सेवन केलं.
सीताराम दास! एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप सीताराम दास नावाच्या व्यक्तीवर आहे. मध्य प्रदेशातील हा इसम एक महंत म्हणून ओळखला जातो. सीताराम दास साधासुधा व्यक्ती नाही. त्याचे संबंध अनेक बड्या लोकांशी असल्याचं समोर आलं आहे. मोठमोठे पोलिस अधिकारी, राजकीय नेते, बिल्डर यांच्यासोबत महंत सीताराम दासचे फोटो समोर आले आहे. या फोटोंनी आता नव्या वादाला तोंड फुटलंय. एका अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करणाऱ्या या बाबावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
1 / 6
सर्किट हाऊसमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत या बाबानं अतिप्रसंग केला. बहाणा करत या मुलीला सर्किट हाऊसवर या बाबाचे भक्त घेऊन आले होते. तिथं या बंद खोली या बाबानं आपल्या भक्तांसोबत दारुचं सेवन केलं. यानंतर जबरदस्ती यामुलीलाही दारु पाजण्यात आली आणि त्यानंतर तिचा बलात्कार करण्यात आला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सर्किट हाऊसमध्ये राजकीय पाहुणे आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र सर्किट हाऊसमध्ये घडलेल्या या प्रकारानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या बाबाच्या अनेक राजकीय आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशीही ओळखी असल्यानं तो सर्किट हाऊसमध्ये आला असावा, अशी शंका घेतली जातेय.
2 / 6
मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि विंध्य क्षेत्राचे प्रतिष्ठीत नेते गिरीश गौतम हेही सीताराम दास यांचे भक्त आहेत. या बलात्कारी आरोपी बाबाचे गौतम यांना आशीर्वाद देतानाचे फोटोही समोर आले आहेत.
3 / 6
फक्त राजकीय नेतेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांचाही बाबाच्या भक्तांमध्ये समावेश आहे. एका फोटोत मध्य प्रदेशच्या रीवामधील एसपी नवनीत भसीन यांच्यासोबतचा फोटोही समोर आला आहे. यात एसपी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात असल्याचं दिसून आलं आहे. नवनीत भसीन हे दबंग पोली अधिकारी म्हणून ओळखले जातात. पण त्यांचा सत्कार बाबांच्या हस्ते होताना बघायला मिळाल्यानंही आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
4 / 6
फक्त राजकीय नेते, पोलीस अधिकारीच नव्हेत तर रिवाचे आयुक्तही चक्क या बाबासोबत दिसून आले आहेत. आयुक्त अनिल सुचारी यांचाही सत्कार करतानाचा बलात्कारी बाबाचा फोटो समोर आलाय.
5 / 6
बलात्काराचा आरोप असलेला हा बाबा पोलीस सुरक्षेतही बाहेर फिरत होता. अनेक मोठमोठे बिल्डर्स आणि उद्योजकही या बाबाचे भक्त असल्याचं बोललं जातंय. बलात्काराचा आरोप असलेला हा बाबा प्रसिद्ध संत आणि माजी राज्यसभा खासदार वेदांती महाराज यांचा जवळचा नातलग असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, आता या बाबावर करण्यात आलेल्या आरोपांनी संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.