अभिषेक साटमनं पेपरच्या 30012 गोल तुकड्यांनी 4x8 फूट या आकारात ही कलाकृती तयार केली आहे. (Preparations for Master Blaster Sachin Tendulkar's birthday, special artwork by Abhishek Satam)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसाची एक वेगळी उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असते. येत्या 24 एप्रिलला सचिन त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
1 / 5
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका चाहत्यानं त्याच्यासाठी सुंदर कलाकृती सादर केली आहे. सचिनचा 48 वा वाढदिवस आणि याच वर्षी भारताने विश्वचषक जिंकून 10 वर्ष झाली आहेत.
2 / 5
यासाठी अभिषेक साटमनं हा ऐतिहासिक क्षण एका वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
3 / 5
पेपरच्या सहा रंगछटा या कलाकृतीत वापरण्यात आल्या आहेत.
4 / 5
पेपरच्या 30012 गोल तुकड्यांनी 4x8 फूट या आकारात ही कलाकृती तयार करण्यात आली आहे.