PHOTO| प्रिन्स नरूलाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, पाहा युविका-प्रिन्सचा खास अंदाज!

बिग बॉस फेम टीव्ही अभिनेता प्रिन्सने आपला 30 वा वाढदिवस आपल्या लेडी लव्ह युविका चौधरी आणि मित्रांसह साजरा केला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:05 PM, 24 Nov 2020
बिग बॉस फेम टीव्ही अभिनेता प्रिन्सने आपला 30 वा वाढदिवस आपल्या लेडी लव्ह युविका चौधरी आणि मित्रांसह साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
प्रिन्स आणि त्याची पत्नी ‘ओम शांती ओम’ फेम अभिनेत्री युविका चौधरीची अप्रतिम बॉन्डिंग फोटोंमध्ये दिसली आहे.
या फोटोंमध्येप्रिन्स काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि जॉगर्समध्ये दिसत आहे, तर युविका मोनोक्रोम पोल्का डॉट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. केक कपात प्रिन्सने युविका आणि मित्रांच्या उपस्थितीत धमाल केली.
प्रिन्स आणि युविका दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. दोघेही त्यांच्या रील आणि रिअल लाईफची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
'बिग बॉस सीझन 9' या रिअॅलिटी शो दरम्यान प्रिन्स आणि युविकाची भेट झाली.
बिग बॉसच्या घरात, युविका फार काळ टिकू शकली नाही. या शो दरम्यान प्रिन्सने युविकाला टीव्हीवर सर्व प्रेक्षकांसमोर प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.