पुणे-नाशिक महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात! एअर बॅगमुळे बालंबाल बचावले, 5 प्रवाशी जखमी

Pune Accident : सुदैवानं या गाड्यांमधील एअर बॅगने प्रवाशांचा जीव वाचवला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

May 27, 2022 | 8:26 AM
सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: सिद्धेश सावंत

May 27, 2022 | 8:26 AM

पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन गाड्या विचित्र पद्धतीने एकमेकांना भिडल्या होत्या. हा अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या अपघाताने राज्यातील अपघातांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय.

1 / 5
दोन कारची आधी समोरासमोर धडक झाली. यानंतर पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनानं अपघातग्रस्त वाहनांना मागून धडक दिली. सुदैवानं या गाड्यांमधील एअर बॅगने प्रवाशांचा जीव वाचवला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

2 / 5
या अपघातामध्ये तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. तिन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा जबर फटका या अपघातात बसला. त्यात गाडीचं बोनेटसह इंजिनलाही मार बसला होता. या गाड्यांचं झालेल्या नुकसानीवर अपघातावेळी असणारा वेग किती प्रचंड होता, याची कल्पना करता येऊ शकेल.

3 / 5
आळेफाटा इथं झालेल्या या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मोठ्या प्रमाणात लोकही अपघात झाल्यानंतर जखणी प्रवाशांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले होते. काही वेळ अपघातानंतर खळबळ उडाली होती.

4 / 5
तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे बराच वेळ पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. दिलासादायक बाब म्हणजे या अपघात कोणतीही जीवतहानी झाली नाही.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें