Marathi News Photo gallery Pune sugarcane workers agitation vanchit aaghadi activist arrested vy pune police
PHOTO : ऊसतोड कामगारांसाठी ‘वंचित’चे कार्यकर्ते रस्त्यावर, पुण्यात राडा
वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी शिवराज बांगर यांना पोलिसांनी अटक केली.
(pune sugarcane workers arrested)
Follow us
पुण्यातील वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची ऊसभाववाढी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी वंचितच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली
या बैठकीसाठी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी शिवराज बांगर यांना पोलिसांनी अटक केली.
या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र तरीही त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला.
पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले. या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.