Marathi News » Photo gallery » Republic day 2022 marathi actors gayatri datar shreyas talpade prarthana behare subodh bhave shiv thackare shared photos about celebrating 73 republic day of india
Republic Day 2022 : मराठी कलाकारांचं देशप्रेम, सोशल मीडियावर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर
देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणाऱ्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अश्यातच मराठी कलाकांरांनी आपले तिरंग्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या इन्स्टाग्रामवर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने 'सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिताँ हमारा', असं कॅपशन दिलं आहे.
1 / 5
अभिनेत्री गायत्री दातारनेही तिरंग्यासोबतच फोटो शेअर केलाय. तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 5
अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेही हातात तिरंगा घेत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. 'वंदे मातरम्... यहाँ वहां सारा जहाँ देख लिया है, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं', असं कॅपशन प्रार्थनाने या फोटोला दिलं आहे.
3 / 5
अभिनेता सुबोध भावे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रजासत्ताक दिनानिमित्त फोटो शेअर केला आहे. '73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...' असं कॅपशन सुबोधने फोटोला दिलं आहे.
4 / 5
अभिनेता शिव ठाकरेनेही तिरंग्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात तो घोड्यावर बसल्याचं दिसतंय. 'Happay Republic Day' असं कॅपशन देत त्याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.