Marathi News » Photo gallery » Sara tendulkar latest photos in yellow tradional dress goes viral on internet
Sara Tendulkar: जणू राजकुमारीच! सारा तेंडुलकरच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग ॲपवर बरीच सक्रिय असून तिथे तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे हे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात.
क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर बरीच सक्रिय असून तिथे तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे हे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात.
1 / 5
शनिवारी सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. 'जणू राजकुमारी असल्यासारखं वाटतंय', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. साराचा हा सुंदर ड्रेस डिझायनर गोपी वैद यांनी डिझाइन केला आहे.
2 / 5
तिच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केलं आहे. 24 वर्षीय साराने नुकताच एका जाहिरातीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
3 / 5
सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अद्याप तिने दिली नाही. सारा अलीकडेच आयपीएल 2022 च्या एका सामन्यादरम्यान आईसोबत दिसली होती. आई अंजली तेंडुलकरसोबत ती मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती.
4 / 5
सारा तेंडुलकर सध्या मुंबईत आहे. ती अनेकदा लंडनमध्ये राहते आणि तिथून तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. इंस्टाग्रामबद्दल तिचे 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.