PHOTOS: सचिन तेंडुलकरकडून पत्नी अंजलीचा वाढदिवस साजरा, गुजराती रेस्टॉरंटमध्ये घेतला जेवणाचा आनंद

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर मैदानातून निवृत्तीनंतर सध्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय दिसून येत आहे. तो आपले आणि कुटुंबाचे अनेक फोटो, किस्से शेअर करत असतो.

1/4
क्रिकेटचं मैदान गाजवणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय दिसून येतो. सण किंवा महत्त्वाच्या दिवशी फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासह सचिन अनेक किस्सेही सांगत असतो. आताही त्याने पत्नी अंजलीचा वाढदिवस साजरा केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2/4
सचिनने पत्नीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कुटुंबियांसोबत एका गुजराती रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा बेत आखला होता. त्याने यावेळी जेवतानाचे फोटो शेअर केले असून अगदी मजेशीर कॅप्शनही दिलं आहे.

3/4
सचिनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये एक मजेशीर किस्सा लिहिला असून फोटोजना एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, 'तिचे (अंजलीचे) गुजराती जीन्स स्ट्राँग आहेत. पण आमच्या जीन्सची बटणं हे जेवण झाल्यानंतर वीक झाली आहेत.'

4/4
सचिनची पत्नी गुजराती असल्याने सचिनने तिच्या वाढदिवसासाठी गुजराती हॉटेल निवडलं असून या हॉटेलचं नाव श्री ठाकर भोजनालय असं आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल 1945 अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाली पासून अस्तित्वात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI