Photo : अरेच्चा! असे कसे जखमी झाले ‘हे’ क्रिकेटपटू? एकाला फिश टँक साफ करताना इंज्युरी

क्रिकेटपटू म्हटलं तर ते खेळताना किंवा सरावादरम्यान जखमी होत असल्याचं आपण ऐकलं असेल, पण इंग्लंडचे काही खेळाडू आपल्या अजब करामतींमुळे जखमी झाले आहेत.

1/8
jason-roy-injury
इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ऑगस्ट, 2018 मध्ये एका देशांतर्गत स्पर्धेत खेळत होता. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने रॉय खूप निराश झाला. त्यामुळे रागात त्याने बॅट जमिनीवर फेकली, जी उडून पुन्हा त्याच्याच तोंडावर लागली आणि तो जखमी झाला.
2/8
jonny-bairstow-injury
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो ऑक्टोबर, 2018 मध्ये सरावादरम्यान फुटबॉल खेळताना जखमी झाला होता. सामन्याआधी सराव करताना फुटबॉल खेळताना जॉनीच्या पायला लागल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता.
3/8
ZACK-CRAWLEY-injury
इंग्लंडचा युवा खेळाडू जैक क्रॉली फेब्रुवारी, 2021 मध्ये भारताच्या दौऱ्यावर असताना मार्बल फरशीवरुन घसरल्याने जखमी झाला होता. त्यामुळे तो भारतविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता.
4/8
RORY-BURNS-injury
इंग्लंडचा फलंदाज रॉरी बर्न्स जॉनी बेयरस्टोप्रमाणेच जखमी झाला होता. जानेवरी, 2020 मध्ये दक्षिण अफ्रीकेच्या दौऱ्यावर असताना रॉरी सरावादरम्यान फुटबॉल खेळताना जखमी झाला होता.
5/8
jofra-archer-injury
इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर तर आपल्या घरीच जानेवारी, 2021 मध्ये जखमी झाला होता. फिश टँक साफ करताना जोफ्राच्या हाताला काच लागल्याने तो जखमी झाला होता ज्यामुळे त्याला भारत दौऱ्यावर मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.
6/8
JAMES-ANDERSON-INJURY
इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स एंडरसन 2010 मध्ये बॉक्सिंग करताना जखमी झाला होता. अॅशेस मालिकेदरम्यान काही क्रिकेटपटू मजेसाठी बॉक्सिंग मॅच खेळत असताना जेम्सला दुखापत झाली होती.
7/8
ben-stokes-wrist-injury
बेन स्टोक्सला देखील आपल्या रागामुळे जखमी व्हाव लागलं होतं. 2014 साली वेस्ट इंडिज दौैऱ्यावर स्वत:च्या खराब प्रदर्शनामुळे निराश झालेल्या स्टोक्सने लॉकर रुममध्ये स्वत:चा हात मोडून घेतला होता
8/8
ben-foakes-1
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन फोक्स काउंटी चॅम्पियनशिपच्या वेळी जखमी झाला होता. ड्रेसिंग रुममध्ये सॉक्सवरुन घसरल्याने त्याला दुखापत झाली होती. यामुळे फोक्स इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकणार आहे.