Photo : ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर चढलं अभिनयाच भूत, म्हणे ‘बेस्ट अॅक्टर’ व्हायचंय!

या खेळाडूने सात वेळा Formula One रेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. आता त्याला अभिनय क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा झाली आहे.

1/5
Lewis Hamilton Acting
ब्रिटनचा सर्वांत श्रीमंत खेळाडू म्हणा किंवा Formula One चा वर्ल्ड चॅम्पियन दोन्ही पदव्यांना साजेसा खेळाडू म्हणजे लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton). Formula One मधील करीयरनंतर काय करु इच्छितो याबद्दल लुईस क्लियर असून त्याने याबाबत नुकतीच माहिती दिली (Formula One Champion Lewis Hamilton Want to Do Acting in Film)
2/5
Lewis Hamilton
लुईस हॅमिल्टन आपल्या भविष्यातील प्लॅनबद्दल म्हणाला की, Formula One मधून निवृत्त झाल्यनंतर मला अभिनय क्षेत्रात करीयर करायचय.
3/5
Formula One Lewis Hamilton
तब्बल 7 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला लुईस 'कार्स 2' आणि 'जूलँडर 2' या फिल्ममध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसला आहे.
4/5
त्यामुळे अभिनयाचा बेसिक अनुभव असलेल्या लुईसने एका मुलाखतीत सांगितले की, ''मी जे काही करेन ते बेस्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्याकडे संधी तर आहेत. पण त्यासाठी मला आधी स्वत:ला पूर्ण तयार करायच आहे.त्यानंतरच मी माझा बेस्ट देऊ शकेन''
5/5
Formula one
लुईससमोर आता बाकू येथील ट्रॅकवरील अजरबेजान ग्रँड प्रिक्स (Azerbaijan Grand Prix) ही एक महत्त्वाची रेस असणार आहे. येत्या 6 जून रोजी ही रेस पार पडणार आहे.