Ind vs Eng: भारत-इंग्लंड पिंक बॉल कसोटीत हे 6 मोठे विक्रम होणार
भारत-इंग्लंड आगामी पिंक बॉल कसोटीत एकमेकांसमोर येतील तेव्हा अनेक विक्रम होणार आहेत. एकूण 6 रेकॉर्ड असे आहेत ते हा सामना झाल्यानंतर तुटू शकतात.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
1:49 AM, 24 Feb 2021
भारत-इंग्लंड आगामी पिंक बॉल कसोटीत एकमेकांसमोर येतील तेव्हा अनेक विक्रम होणार आहेत. एकूण 6 रेकॉर्ड असे आहेत ते हा सामना झाल्यानंतर तुटू शकतात. यातील तब्बल 4 तर केवळ विराट आणि अश्विनशी संबंधित आहेत.
भारत-इंग्लंड आगामी पिंक बॉल कसोटीत एकमेकांसमोर येतील तेव्हा अनेक विक्रम होणार आहेत. एकूण 6 रेकॉर्ड असे आहेत ते हा सामना झाल्यानंतर तुटू शकतात. यातील तब्बल 4 तर केवळ विराट आणि अश्विनशी संबंधित आहेत.
विराट कोहली पिंक बॉल कसोटीत शतक ठोकून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा कर्णधार होऊ शकतो. सध्या विराट रिकी पॉन्टिंगच्या 41 शतकांच्या बरोबरीत आहे.
विराट कोहली आणखी एक विक्रम या पिंक बॉल टेस्टमध्ये करु शकतो. विराटने आपल्या नेतृत्वात हा कसोटी सामना जिंकल्यास भारतात जिंकलेल्या त्याच्या सामन्यांची संख्या 22 होईल. यानंतर विराट 21 कसोटी जिंकणाऱ्या धोनीला मागे टाकेन.
अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्यासाठी 6 विकेटची गरज आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये अश्विन ही कमाल करु शकतो.
इंटरनेशनल क्रिकेटमध्ये अश्विन आपल्या 600 व्या बळीच्या जवळ आहे. त्याला केवळ 4 विकेटची गरज आहे. म्हणजेच पिंक बॉल टेस्टमध्ये अश्विन हा नवा विक्रम करु शकतो.
इंग्लंडविरोधातील पिंक बॉल टेस्टमध्ये इशांतच्या करियरचा 100 वा कसोटी सामना होणार आहे. यातच तो सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या जहीर खानला मागे टाकू शकतो. यासाठी इशांतला 9 विकेटची गरज आहे.
एक रेकॉर्ड इंग्लंडचा कर्णधार जो रूट देखील तोडू शकतो. मात्र, यासाठी त्याला या कसोटी मालिकेत विजय मिळवावा लागेल. रूट सध्या 26 कसोटी सामने जिंकून मायकल वॉनच्या बरोबरीत इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून यादीत आहे. हा सामना जिंकल्यास जो वॉनला मागे टाकेन.