Ravi Shastri Birthday : भारतीय संघाचा हुकुमी एक्का ते टीम इंडियाचे कोच, रवी शास्त्रींची कारकीर्द

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतातील एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांचा आज वाढदिवस असून ते 59 वर्षांचे झाले आहेत.

1/7
ravi shastri
भारताचे एक स्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट फिरकीपटू अशी रवी शास्त्रींची (Former Indian Crickete Ravi Shastri) ओळख आहे. त्यांचा जन्म 27 मे 1962 रोजी मुंबईत झाला होता.
2/7
ravi s
रवी शास्त्री यांनी 40 वर्षांपूर्वी 21 फेब्रुवारी, 1981 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेलिंग्टन येथे शास्त्री आपला पहिला कसोटी सामना खेळले होते
3/7
ravi shastri century
शास्त्री यांनी 1984 साली मुंबईतील वानखेडे मैदानावर आपले पहिले शतक लगावले होते. इंग्लंड विरोधात त्यांनी 142 धावां ठोकत आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद केली होती
4/7
ravi test
शास्त्री यांनी 80 कसोटी सामन्यांत 35.79 च्या सरासरीने 3 हजार 830 धावा केल्या. ज्यात 11 शतकांसह 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 151 बळी देखील पटकावले आहेत.
5/7
ravi one day
एकदिवसीय क्रिकेटचा विचार करता शास्त्रींना आपल्या कारकीर्दीत 150 सामन्यांत 29.04 च्या सरासरीने 3 हजार 108 धावां केल्या असून त्यात चार शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
6/7
ranji ravi
शास्त्री यांनी 1984-85 साली मुंबईकडून दिल्लीविरुद्ध रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी संबधित सामन्याचा फोटो टाकत आठवणींना उजाळा दिला
7/7
indian team
भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण असणाऱ्या १९८३ च्या विश्वचषकाच्या संघात देखील रवी शास्त्री होते. त्यामुळेच भारताचे दिग्गज खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.