IPL 2022 Retention : चेन्नई सुपरकिंग्ज ‘या’ चार खेळाडूंना रिटेन करणार, मराठमोळ्या ऋतुराजचं काय होणार? ब्राव्हो-डुप्लेसीचा पत्ता कट

IPL 2022 Retention साठी 14 व्या हंगामाची विजेती टीम चेन्नई सुपरकिंग्ज 4 खेळाडूंना रिटेन करणार आहे. त्यामध्ये ड्वेन ब्राव्हो. फाफ डुप्लेसी, जोश हेझलवुड आणि अंबाती रायडू यांच्या नावांचा समावेश नसल्याचं कळतंय.

1/5
चेन्नईच्या टीमनं आयपीएलचं चारवेळा विजेतेपद पटकावलं आहे. ही टीम कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चेन्नईच्या फॅन्ससाठी कोणते खेळाडू रिटेन केले जातील याचा अंदाज लावणं सोप आहे. चेन्नईच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापनानं रिटेन करायच्या चार खेळाडूंना फायनल केलं आहे. यामध्ये फाफ डुप्लेसी, सॅम कर्रन, जोश हेझलवुड, ड्वेन ब्राव्हो आणि अंबाती रायडू यांच्या नावांचा समावेश नसल्याचं कळतंय.

2/5
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं आयपीएलचं 14 पर्वं जिंकलं आहे. धोनींनं संघाला मोठ यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं चेन्नईला धोनीला रिटेन करण्याशिवाय पर्याय नाही असं दिसतंय.

3/5
रवींद्र जाडेजाला देखील चेन्नईच्यावतीनं रिटेन केलं जाणार आहे. जाडेचा चेन्नईचा स्टार खेळाडू आहे. जाडेजानं त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नईला विजय मिळवून दिले आहेत. जाडेजानं गेल्या सीझनमध्ये 12 मॅचमध्ये 75 पेक्षा जास्त सरासरीनं 227 धावा केल्या होत्या. तर त्याचा स्ट्राईक रेट 145 होता याशिवाय त्यानं 13 विकेट घेतल्या होत्या.

4/5
चेन्नईची टीम मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला देखील रिटेन करण्याची शक्यता आहे. ऋतुराजला चेन्नईच्या टीमचं भविष्य मानलं जात आहे.  या युवा खेळाडूला टीम रिटेन करण्याची  शक्यता आहे. 2021 च्या हंगामातील  तो ऑरेंज कॅप विनर आहे. त्यानं 16 मॅचमध्ये 635 धावा केल्या होत्या.

5/5
परदेशी खेळाडूंमध्ये चेन्नईची टीम मोईन अलीला रिटेन करु शकते. मोईन अलीनं  14 व्या हंगामात 357 धावा केल्या होत्या त्याशिवाय  6 विकेट देखील घेतल्या होत्या. त्याचा इकॉनॉमी रेट 6.35  राहिला होता.

Published On - 9:28 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI