Photo : IPL Auction | 5 खणखणीत षटकारांनी पालटलं नशीब, चेन्नईने मोईन अलीला तब्बल एवढ्या कोटी रुपयांना खरेदी केलंय…!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:03 PM, 20 Feb 2021
1/5
India cricket team 1
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भलेही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या मॅचमध्ये इंग्लंडच्या मोईन अलीने बहारदार बोलिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आणि तडकाफडकी 43 रन्स केले. याचंच बक्षीस त्याला मिळालं आहे. आयपीएल 2021 च्या बोलीमध्ये 3.5 अधिक पटीने तो विकला गेला आहे.
2/5
India cricket team 2
आयपीएलमध्ये त्याला मिळालेल्या बोलीपाठीमागे भारताविरुद्धची दुसऱ्या मॅचची मोईन अलीची कामगिरी असल्याची चर्चा आहे
3/5
India cricket team 3
मोईनने बॉलने आपला जलवा दाखवलाय पण त्याची बॅटही बोलली. त्याने तडकाफडकी 43 रन्स बवनवताना 5 सिक्सर आणि तीन चौकार लगावले.
4/5
India cricket team
मोईन अलीला खरेदी करण्यासाठी किंग्ज एलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुप्पर किंग्जमध्ये स्पर्धा होती. अखेर चेन्नईने 7 कोटी रुपये देऊन त्याला खरेदी केलं. मोईन अलीची बेस प्राइस 2 कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच तो 3.5 पटीने अधिक महाग विकला गेला.
5/5
India cricket team 5
मोईन अलीने आपल्या टी ट्वेन्टी करिअरमध्ये 167 मॅचेसमध्ये 25 च्या सरासरीने 3513 रन्स केले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 140 एवढा आहे. त्याने 2 शतकं झळकवली आहे तसंच 19 अर्धशतके देखील ठोकली आहेत