MS धोनीपासून केन विल्यमसनपर्यंत, नवं रणांगण, नवा बादशाह, 7 टूर्नामेंट, प्रत्येक वेळी नवा विजेता!

आयसीसीच्या शेवटच्या 7 स्पर्धांची कहाणी रोमांचक आहे. शेवटच्या 7 आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी विजेतेपदाचा करंडक नवीन कर्णधार उंचावतो. (Last 7 ICC tournament 7 Diffrent Champions MS Dhoni kane Williamson)

1/7
144 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कसोटी विश्वचषक खेळला गेला. नाव दिलं गेलं, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल.... साऊथॅम्प्टनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडच्या संघांदरम्यान सामना पार पजला. शेवटी सर्वोत्तम खेळ करणाऱ्या किवी संघाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली यासह किवी संघाने आयसीसी करंडकाचा दुष्काळही समाप्त केला. कर्णधार केन विल्यमसन कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. वास्तविक, आयसीसीच्या शेवटच्या 7 स्पर्धांची कहाणीही अशीच आहे. पुरुषांच्या क्रिकेटशी संबंधित शेवटच्या 7 आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी विजेतेपदाचा करंडक नवीन कर्णधार उंचावतो.

2/7
आयसीसी टूर्नामेंट्सचा हा सिलसिला 2013 मध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चॅम्पियन्स करंडक जिंकल्यापासून सुरु झाला. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने धोनीच्या नेतृत्वात यजमानांना पराभूत करून विजेतेपद जिंकले. या करंडकामुळे धोनी जगातील एकमेव कर्णधार बनला आहे ज्याने आयसीसीचे तीनही मोठे विजेतेपद जिंकले.

3/7
2014 मध्ये आयसीसी टी -20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला गेला. ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका आणि भारताचे संघ आमनेसामने होते. पण त्यावर्षी श्रीलंकेने पहिल्यांदा भारताला हरवून टी -20 विश्वचषक जिंकला. तसंच 2011 च्या पराभवाची सव्याज परतफेड केली.

4/7
2015 वर्ल्ड कप फायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली गेली. टीम इंडिया डिफेंडिग चॅम्पियन होती.परंतु यावर्षी टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता आली नाही. 29 मार्च 2015 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून ऑस्ट्रेलिया नवीन चॅम्पियन बनली.

5/7
2016 चा टी -20 विश्वचषक भारतात खेळला गेला होता परंतु भारत भूमीवर टीम इंडिया या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नव्हती. गतविजेत्या श्रीलंकेलाही अंतिम फेरी गाठली आली नाही. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात कोलकाता येथे अंतिम सामना झाला, त्यामध्ये कॅरेबियन संघ दुसर्‍यांदा टी -20 चा चॅम्पियन बनला. या सामन्यात कार्लोस ब्रॅथवॅटने सलग चार षटकार मारुन संघाला विजयी केलं.

6/7
2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा आयोजित करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली. टीम इंडिया आपला इतिहास कायम ठेवून आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकेल, असा सगळ्यांना विश्वास होता. पण सरफराज अहमदच्या नेतृत्वात असलेल्या पाकिस्तान संघाने हे होऊ दिले नाही. पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनला.

7/7
विश्वचषक 2019 चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की कोणत्याही संघाला विजेतेपदाची चव माहिती नव्हती. म्हणजेच, जो जिंकणार तो नवीन चॅम्पियन होणार होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून इंग्लंडने प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI