Photo : बाबरच नाही, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूंनीही रचला चुलत बहिणीशी विवाह, एका दाम्पत्याची तर पाच मुलं

सध्या पाकिस्तान संघाचा अव्वल फलंदाज असणारा बाबर आजमने नुकताच चुलत बहिणीशी साखरपुडा केला. लवकरच तो तिच्याशी लग्नबेडीत अडकणार आहे.

1/5
Babar-Azam
पाकिस्तानचा बाबर आजम नुकत्याच आयसीसीने जाहिर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या बेस्ट फलंदाजामध्ये नंबर एकला आहे. बाबरने काही महिन्यांपूर्वी चुलत बहिनीशी साखरपुडा केला असून लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली. चुलत बहिनीशी लग्न करणारा बाबर पहिलाच क्रिकेटपटू नसून याआधी देखील अनेकांनी असे केले आहे. (Many Cricketers married to there sister Pakistan captain babar azam is going to marry soon)
2/5
shahid
या यादीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा समावेश आहे. शाहिदने 20 वर्षाच्या वयात आपल्या मामाची मुलगी नादियासोबत लग्न केलं होत. 22 ऑक्टोबर 2000 रोजी या दोघांनी लग्न केलं होत. शाहिदला पाच मुली असून अक्सा, अंशा, अजवा, असमारा आणि अरवा अशी त्याच्या पाच मुलींची नावे आहेत.
3/5
Mustafizur rehman
शाहिदनंतर सध्याचा बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने देखील आपल्या चुलत बहिनीशीच लग्न केलं आहे. सामिया परवीन शिमू अस तिच नाव असून2019 च्या मार्च महिन्यात मुस्तफिजूर आणि सामिया लग्नबंधनात अडकले होते.
4/5
mossadeik
मुस्तफिजूर सारखेच आणखी एका बांग्लादेशी क्रिकेटपटूने चुलत बहिनीशी लग्न केले आहे. मोसद्देक हुसैन असं त्याच नाव आहे. मोसद्देक हुसैनने 2012 साली चुलत बहीण शरमीन समीरासोबत लग्न केलं असून त्याच्यावर हुंडा घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्यामुळे त्याला संघातील स्थान गमवाव लागलं होत.
5/5
Saeed-Anwar
शाहिद प्रमाणेच पाकिस्तानचा माजी खेळाडू सईद अन्वरने 1996 साली चुलत बहीण लुब्नासोबत लग्न केलं होतं. दरम्यान 2001 साली दुर्देवाने सईदच्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर 2003 विश्वचषकानंतर सईदने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.