Photo : भारतीय क्रिकेटपटू मिताली राजकडून रिक्षा चालकांना मदत, किराणा मालासह रोख रक्कम

मिताली राज सध्या परदेशात असल्याने तिचे वडील स्वत: मदतीसाठी रिक्षाचालकांकडे पोहोचले आहेत.

  • Publish Date - 4:01 pm, Wed, 26 May 21 Edited By: SachinP
1/5
Mithali Raj
संपूर्ण जगासह भारताची सध्या कोरोना विषाणूविरुद्ध लढाई सुरु आहे. यावेळी अनेकजण गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजही मदतीसाठी सरसावली आहे.
2/5
mithali helps drivers
मिताली राजने गरजू रिक्षाचालकांची मदत केली. मितालीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर तिने फोटो शेअर करत, मदतीचं आवाहन केलं आहे.
3/5
mithali helps drivers
मिताली राज सध्या बाहेरगावी असल्याने, तिचे वडील तिच्यातर्फे गरजू रिक्षाचालकांना किराणा सामान आणि पैशाची मदत करत आहेत.
4/5
mithali helps drivers
कोरोनाच्या कठीण काळात 'मिताली राज इनिशिएटिव्हतर्फे' माझे वडील गरजू रिक्षाचालकांना पैसे आणि किराणा मालाचे वाटप करत आहेत. मागीलवर्षी मी सुरु केलेली ही कामगिरी माझ्या अनुपस्थितीत माझे वडील पार पाडत आहेत.'' असे मितालीने म्हटलं आहे.
5/5
mithali helps drivers
या फोटोंमध्ये वडिलांचा मास्क नाकाखाली गेल्याचे दिसत आहे, हे देखील मितालीने आपल्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.