Photo : बलॉन डी’ऑरचा मान मेस्सी, रोनाल्डोपासून हिसकावण्यासाठी ‘हे’ खेळाडू तयार, दोघेही फ्रान्स नॅशनल संघाचे खेळाडू

फुटबॉल विश्वातील सर्वांत मानाचा पुरस्कार म्हणजे 'बलॉन डी'ऑर'. सर्वाधिक बलॉन डी'ऑर हे लिओनल मेस्सीने पटकावले असून यंदा या शर्यतीत काही नवीन नावे सामिल झाली आहेत.

1/5
ballon dor
फ्रान्स फुटबॉल असोसिएशन तर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडून बलॉन डी'ऑर (Ballon d or) हा पुरस्कार दिला जातो. फुटबॉल इतिहासातील सर्वात जुन्या आणि मानाच्या या पुरस्कारासाठी दरवर्षी अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये चूरस पाहायला मिळते. (N golo Kante Ahead is in Race With Lionel messi and Cristiano Ronaldo For Ballon d or 2021)
2/5
messi ronaldo
मागील काही वर्षे पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि अर्जेंटिनाच्या लिओनल मेस्सी (Lionel Messi) यांच्यात बलॉन डी'ऑरसाठी चूरशीची लढत पाहायला मिळते. इतर खेळाडूंपेक्षा त्यांचा खेळ कमालीचा असतो. यंदा मात्र या रेसमध्ये आणखी दोन खेळाडू सामिल झाले आहेत.
3/5
kante
फ्रान्स संघाचा आणि चेल्सी क्लबकडून खेळणारा मिडफिल्डर एनगोलो कान्ते असं यातील एका खेळाडूच नाव आहे. कान्ते याने नुकतंच चेल्सी संघाला UEFA Champions League मध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
4/5
kylin mbappe
कान्ते पाठोपाठ फ्रान्स संघाचा फॉरवर्ड खेळाडू आणि पॅरिस सेन्ट जर्मन क्लबकडून खेळणारा कायलिन एम्बापे ही या शर्यतीत आहे. त्यानेही यंदा अप्रतिम कामगिरी केली असून तो देखील बलॉन डी'ऑरचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
5/5
messi
आतापर्यंत सर्वाधिक बलॉन डी'ऑर हे मेस्सीने मिळवले असून त्याने सहा पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. तर त्याच्यापाठोपाठ रोनाल्डोने चार बलॉन डी'ऑर पटकावले आहेत.