अबब! या संघाची किंमत 28 हजार कोटी रुपये, यंदाचा सर्वांत महागडा फुटबॉल क्लब!

जगातील लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. फुटबॉलमधील टॉपच्या संघाची किंमत ही अब्जांच्या घरात असल्याचं कायमच दिसून आलं आहे.

1/5
युरोपियन फुटबॉल क्लब रिअल माद्रिद यंदाही सर्वात महागडा फुटबॉल क्लब ठरला आहे. केपीएमजीने दिलेल्या मूल्यांकन अहवालात रिअल माद्रीद सर्वात महागडा क्लब ठरला असून त्याची एकूण किंमत 28 हजार कोटी रुपये इतकी ठरली आहे.
2/5
manu-
यंदा पहिल्यादांच 13 फुटबॉल क्लब्सची किंमत बिलियन यूरोजच्या घरात पोहोचली आहे. मागील वेळीप्रमाणे रिअल माद्रीद यंदाही पहिल्या स्थानी विराजमान आहे. रिअल माद्रीद पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर इंग्लिश प्रिमीयर लीगमधील मँचेस्टर युनायटेड हा संघ आहे.
3/5
fcb-celebracion
त्यानंतर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा संघ बार्सिलोना यंदा बायर्न म्यूनिच संघाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
4/5
Liverpool
बार्सिलोना पाठोपाठ युएफा (UEFA)चॅम्पियन्स लीगविजेता लिव्हरपूल पाचव्या स्थानी विराजमान असून आर्सनेलचा संघ 10 व्या स्थानी पोहोचला आहे.
5/5
cristiano ronaldo juventus
दरम्यान यावर्षी पहिल्यांदाच इटलीमधील कोणताही क्लब या लिस्टमध्ये जागा बनवू शकला नाही. प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जुव्हेंटस संघ टॉप 10 मध्ये नसल्याने रोनाल्डोचे चाहते निराश झाले आहेत. त्याजागी नेयमारचा संघ पीएसजी नवव्या स्थानी आहे.