T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाच प्रदर्शन फार खराब राहिलं. भारतीय संघ सेमीफायनलपर्यंतही पोहचू शकलेला नाही. भारत असणाऱ्या गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ सेमीसमध्ये पोहोचलेले आहेत.

Nov 09, 2021 | 7:42 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Nov 09, 2021 | 7:42 PM

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघाने अतिशय खराब प्रदर्शन केलं. सेमीफायनलच्या सामन्यापूर्वीच भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. दरम्यान भारत स्पर्धेबाहेर होताच भारतीय खेळाडू जो सध्या कॉमेन्टीटर म्हणूनही काम करतो त्या दिनेश कार्तिकने त्याच्या मते विश्वचषकातील बेस्ट 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा केवळ एक खेळाडू असून रोहित-विराट सारखे खेळाडूही नाही आहेत.

1 / 5
दिनेश कार्तिकने निवडलेल्या संघाचा कर्णधार म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचं नाव जाहीर केलं आहे.

2 / 5
दिनेश कार्तिकने निवडलेल्या संघात एकमेव भारतीय खेळाडू असून तो म्हणजे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आहे.

3 / 5
दिनेश कार्तिकची प्लेइंग 11- बाबर आजम (कर्णधार), जोस बटलर, चरिथ असालंका, रासी वैन डार दुसां, शाकिब अल हसन, मोइन अली, वानेंदु हसारंगा, एडम जंपा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि शाहीन अफरीदी.

4 / 5
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पहिला सेमीफायनलचा सामना बुधवारी (10 नोव्हेंबर) पार पडणार आहे. यावेळी न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आमने सामने असणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. यावेळी 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरा सामना शुक्रवारी (11 नोव्हेंबर) वरील वेळेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें