Photo : रवी शास्त्री सर्वांत श्रीमंत प्रशिक्षक, वार्षिक उत्पन्न कोटींत, महागड्या गाड्यांचेही शौकीन

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्हा चक्रावून जाल.

1/7
ravi
भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री (Former Indian Cricketer Ravi Shastri) म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचं नाव. तरुणपणी मैदान गाजवणारे शास्त्री आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
2/7
ravii
1992 साली शेवटचा एकदिवसीय सामना खेळल्यानंतर शास्त्री 2007 मध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर 2014 ते 16 ते भारतीय संघाचे डायरेक्टर देखील राहिले आहेत. त्यानंतर जुलै 2017 मध्ये त्याना भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले.
3/7
ravi shastri coach
शास्त्रीच्या शिकवणीतच भारतीय संघ 2019 विश्वचषकाच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्येही भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे.
4/7
ravi-compressed
मैदानात प्रत्यक्ष सामना खेळत नसले तरी शास्त्रींची कमाई कोटींच्या घरात आहे. ते सर्वाधिक कमाई करणारे प्रशिक्षक आहेत. बीसीसीआयकडून (BCCI) शास्त्रींना दरवर्षी 9.5 ते 10 कोटी रुपये इतके मानधन मिळते.
5/7
ravi s
रवी शास्त्री यांना दरवर्षी मिळणाऱ्या मोठ्या मानधनाइतकेच त्यांचे शौक देखील मोठे आहेत. त्याच्यांकडे एकापेक्षा एक भारी गाड्या असून त्यांची एकूण संपत्ती 58 कोटींच्या आसपास आहे.
6/7
ravishastri a-
रवी शास्त्री हे महागड्या गाड्यांचे शौकीन असून त्यांच्याकडे ऑडी (Audi), बीएमडब्लू (BMW), फोर्ड (Ford) या कंपन्यांच्या गाड्या आहेत. 1985 त्यांना बेंसन एंड हेजेज वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी एक शानदार ऑडी गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
7/7
Ravi shastri Wedding-compressed
रवी शास्त्री यांच्या खाजगी जीवनाचा विचार करता 1990 मध्ये रितू सिंग यांच्यासोबत त्यांच लग्न झालं होतं. पण 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2012 शास्त्री यांनी घटस्फोट घेतला. त्यांना 13 वर्षांची एक मुलगी आहे.