1/5

वुमन्स टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा आज ( 8 मार्च) 32 वा वाढदिवस. हरमनप्रीतने वयाच्या 33 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. हरमनप्रीतने क्रिकेट विश्वात आपल्या बॅटिंगने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
2/5

तिने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2017 मधील वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये 171 धावांची विजयी खेळी केली. ती खेळी आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे.
3/5

यामध्ये तिने 20 चौकार आणि 7 षटकार खेचले होते. या 7 सिक्ससह हरमनप्रीत टीम इंडियाकडून एका डावात सर्वाधिक सिक्स लगावणारी पहिली फलंदाज ठरली.
4/5

ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्याच्या विजयाचा प्रबळ दावेदार समजला जात होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 25 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 101 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौरने कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत विजयी खेळी साकारली होती.
5/5

हरमनप्रीतने केलेली ही खेळी महिला वर्ल्ड कपमधील बाद फेरीतील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. तिच्या दीडशतकाच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 42 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 281 धावा चोपल्या होत्या. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 245 धावांवर ऑलआऊट झाली.