Photo : मला मोठी फॅमिली हवी, ‘या’ क्रिकेटपटूच्या होणाऱ्या बायकोचं स्वप्न

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तो प्रेयसी मॉली किंगसोबत ( Mollie King) लग्न करणार आहे.

1/4
Stuart Broad wife
स्टुअर्ट ब्रॉड हा मॉली किंग ( Mollie King)या त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करणार असून ती एक ब्रिटीश सिंगर आहे. ब्रॉड आणि मॉली 2012पासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान 2018 मध्ये त्यांच नातं तुटल्याची चर्चा होती. मात्र अखेर या दोघांनी लग्न करुन एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
2/4
Stuart Broad couple
मॉली किंग आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. या दोघांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटोही पोस्ट केले होते. ज्या फोटोजना '2021ची यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नाही,' असं कॅप्शनही दिलं होतं.
3/4
Stuart Broad wife
मॉली किंग हिने लग्न होण्याआधीच ब्रॉडकडे विविध मागण्या करायला सुरुवात केली आहे. मॉलीनं फिमेल फर्स्ट मॅगझीनला दिलेल्या माहितीत सांगितले की, ''मला एक मोठी फॅमिली हवी आहे, जिच्यावर मी भविष्यात भरपूर प्रेम करू शकेन. कुटुंबीयांच्या प्रेमात राहणे, हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे.''
4/4
england stuart broad
स्टुवर्ट ब्रॉड हा इंग्लंड संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. अत्यंत अनुभवी असल्याने कसोटी सामन्यांत त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. ब्रॉड 2 जूनपासून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सामिल होणार असून त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात ही तो खेळणार आहे.