PHOTO : बाबांची ‘लेक’ही आणि राष्ट्रवादीची ‘ताई’ही

सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरूनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला. | Supriya Sule NCP

Apr 14, 2021 | 4:43 PM
Rohit Dhamnaskar

|

Apr 14, 2021 | 4:43 PM

एकीकडे शरद पवारांचं आजारपण आणि दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूक अशी दुहेरी पेचात सापडलेल्या सुप्रिया सुळे यांनी वेळ पडल्यास एखादी स्त्री किती मल्टीटास्किंग होऊ शकते, याचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी बुधवारी एक मुलगी आणि पक्षाची एक कार्यकर्ता या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या.

1 / 5
शरद पवार यांच्या आजारपणामुळे सुप्रिया सुळे यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता. मात्र, बुधवारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरूनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला.

2 / 5
त्यांच्या या व्हर्च्युअल सभेची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचं एक वेगळं नातं होतं. मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

4 / 5
सुप्रिया सुळेंचा पंढपुरातील मतदारांशी ऑनलाईन संवाद

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें