डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेताय? तर लक्षात असुद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

कार्डने व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु असे अनेक लोक आहे ज्यांना क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व नियमांची माहिती असेल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:43 PM, 27 Jan 2021
1/7
कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कॅश देण्यापेक्षा नागरिक कार्डने पेमेंट करणं आणि ऑनलाईन पमेंटला जास्त पसंती देत आहेत. यामुळे देशात कार्ड पेमेंटचा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
2/7
डेबिट असो की क्रेडिट कार्ड, लोकांचा विश्वास आधीच वाढला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी देशामध्ये तब्बल दीड कोटी क्रेडिट कार्ड वाटले जातात. कार्डने व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु असे अनेक लोक आहे ज्यांना क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व नियमांची माहिती असेल.
3/7
SBI Card BPCL jointly launch credit card offering benefits to high fuel spending customers
क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी अनेक नियम आणि खास वैशिष्ट्ये आहे. पण ही माहिती नसल्यामुळे ग्राहकांना त्याचा अधिक फायदा घेता येत नाही. यासाठी जाणून घेऊयात काय आहे महत्त्वाची वैशिष्ट्ये
4/7
सवयीनुसार घ्या कार्ड - सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य कार्डची निवड करणं. क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँक कर्मचारी तुमच्याशी अनेक वेळा संपर्क करतात. परंतु कुठलंही कार्ड घेण्याआधी तुम्ही खर्चाच्या पद्धतीबद्दल विचार केला पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वत: ची बाईक वापरत असल्यास तुम्ही को-ब्रँडेड इंधन कार्ड घ्यावं. हे कार्ड तुम्हाला इंधनात मोठ्या प्रमाणात सूट देतं.
5/7
जास्त व्याज दर टाळा - क्रेडिट कार्ड तुम्हाला विनामूल्य क्रेडिट सुविधा पुरवते. पण तुम्ही जर हफ्ता चुकवला तर त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतात. यामुळे महागडं पेमेंट टाळण्यासाठी, देय वेळेवर देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार्ड घेताना या बाबी लक्षात असूद्या.
6/7
एकापेक्षा जास्त कार्ड घेणं योग्य आहे का? - जितके जास्त कार्ड तुम्ही वापराल तितका जास्त खर्च तुम्हाला आहे.
7/7
पण जास्त वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त कार्ड असले पाहिजे असं लोक सल्ला देतात. अधिक कार्डे असण्याने आपण अधिक सौद्यांचा लाभ घेण्यास सक्षम असाल.