Marathi News » Photo gallery » The slab of the bridge collapsed on the railway foot, what happened next...
रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला, नंतर जे घडलं ते…
निलेश डाहाट | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी
Updated on: Nov 27, 2022 | 8:02 PM
चंद्रपूर रेल्वेस्थानकावर मोठी दुर्घटना घडली. बल्लारशाह ओवर ब्रीजचा एक भाग कोसळला. यात प्रवास करणारे प्रवासी ६० फूटांवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं.
Nov 27, 2022 | 8:02 PM

1 / 5
बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला. प्रवासी पायी चालत असलेल्या एक स्लॅब कोसळून दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
2 / 5
काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून होता. या दुर्घटनेमुळं प्रवाशांत भीतीचं वातावरण पसरलंय.
3 / 5
काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी या सर्व जखमी प्रवाशांना मदत केली.
4 / 5
सध्या बल्लारशा रेल्वे स्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी आहे. या भागात आणखी अपघात व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पथक तैनात करण्यात आले.