Marathi News » Photo gallery » These are the 5 cheapest cities in the world; This city in India ranks third
‘ही’ आहेत जगातील 5 सर्वात स्वस्त शहरे; भारतातील ‘हे’ शहर तिसऱ्या क्रमांकावर
अनेक जणांना पर्यटनाची आवड असते, मात्र पर्यटनासाठी घराच्याबाहेर पडताना बजेटचा विचार करावा लागतो. सर्वजण आपल्याला संभाव्य ठिकाणी जाण्यासाठी किती खर्च येणार? बजेट आपल्या आवक्यामधील आहे का? या गोष्टींचा विचार करूनच घराबाहेर पडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही शहरांची माहिती देणार आहोत, ज्या शहरांचा समावेश हा जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये होतो.
ल्जीयर्स: हे शहर अल्जेरियाची राजधानी आहे. सर्वात स्वस्त शहरांच्या यादीमध्ये हे शहर प्रथम स्थानावर आहे. दरवर्षी लाखो पर्यटक अल्जीयर्सला भेट देत असतात. हे शहर प्रामुख्याने इथे असलेल्या प्राचिन काळातील महालांसाठी आणि व्हाईट बिल्डिंग्ससाठी ओळखले जाते.
1 / 5
काराकस : काराकस हे व्हेनेझुएलामधील एक प्रसिद्ध शहर आहे, हे शहर देखील अतिशय स्वस्त असून, ते आपल्या संस्कृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर राफ्टिंग आणि सफारीची आवाड असेल तर काराकसला तुम्ही आवश्य भेट द्यावी. येथील राफ्टिंग जगप्रसिद्ध आहे.
2 / 5
Delhi
3 / 5
दमिश्क: दमिश्क ही सीरियाची राजधानी आहे, हे एक अतिप्राचीन शहर आहे. या शहराती एक वेगळी अशी संस्कृती आहे. तसेच येथील खाण्याचे पदार्थ जगप्रसिद्ध आहे. येथील पदार्थांचा अस्वाद घेण्यासाठी आणि शहरातील प्राचिन पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या शहरात येत असतात.
4 / 5
ताश्कंद : ताश्कंद हे शहर उजबेकिस्तानमध्ये आहे, हे शहर देखील स्वस्त असून, येथील मोठमोठ्या बाजारपेठा या जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षनाचा केंद्रबिंदू असतात. या बाजारपेठांमध्ये अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना पहायला मिळतो. त्यामुळे दरवर्षी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी लाखो पर्यटक ताश्कंदला भेट देतात.