Gyanvapi masjid case : ब्रिटीश राजवटीतील ‘या’ निर्णयानं बदलू शकते ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची दिशा; काय आहे तो निर्णय? वाचा सविस्तर

हिंदू पक्षाने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की केवळ वक्फच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही मशीद बांधली जाऊ शकते. तसेच कोणत्याही मुस्लिम शासकाच्या आदेशानुसार मंदिराच्या जागेवर बांधलेली मशीद वैध मानली जाऊ शकत नाही.

| Updated on: May 23, 2022 | 2:31 PM
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत अर्ज दाखल करणाऱ्या 5  महिलांनी आता सर्वोच्च न्यायालयात मोठा दावा केला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात ज्ञानवापी मशिदीची संपूर्ण जमीन काशी विश्वनाथ मंदिराची असल्याचे म्हटले आहे.

1 / 10
 महिलांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ  ब्रिटीश राजवटीत एका ट्रायल कोर्टाच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. 1936 मध्ये, ट्रायल कोर्टाने मुस्लिम बाजूने केलेल्या याचिकेवर ज्ञानवापी मशिदीची जमीन वक्फची मालमत्ता म्हणून ओळखण्यास नकार दिला होता.

2 / 10
हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, ब्रिटिश सरकारच्या काळात ही जमीन मंदिराची असल्याचा योग्य निर्णय 
 न्यायालयाने दिला होता.

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, ब्रिटिश सरकारच्या काळात ही जमीन मंदिराची असल्याचा योग्य निर्णय न्यायालयाने दिला होता.

3 / 10
याबरोबरच न्यायालयाने आपले  विचार  मांडताना असे म्हटले होते की, ज्ञानवापी मशीद ही वक्फ मालमत्ता असल्याचा कोणताही पुरावा कधीही मिळालेला नाही. म्हणूनच मुस्लिम कधीही ती मशीद असल्याचा दावा करू शकत नाहीत.

4 / 10
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 'इतिहासकारांनी पुष्टी केली आहे की मुघल शासक औरंगजेबने 9 एप्रिल 1669 रोजी एक फर्मान जारी केला होता, ज्यामध्ये आदि विश्वेश्वर मंदिराचा विध्वंस करण्यात आल्याचे म्हटले होते.

5 / 10
परंतु औरंगजेबाने किंवा त्यानंतरच्या कोणत्याही शासकाने ती वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेली कोणतीही नोंद सापडत नाही. किंवा ती मालमत्ता मुस्लिम किंवा कोणत्याही मुस्लिम संघटनेला सोपवली आहे.

6 / 10
हिंदू पक्षाने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की केवळ वक्फच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही मशीद बांधली जाऊ शकते. तसेच कोणत्याही मुस्लिम शासकाच्या आदेशानुसार मंदिराच्या जागेवर बांधलेली मशीद वैध मानली जाऊ शकत नाही.

हिंदू पक्षाने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की केवळ वक्फच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही मशीद बांधली जाऊ शकते. तसेच कोणत्याही मुस्लिम शासकाच्या आदेशानुसार मंदिराच्या जागेवर बांधलेली मशीद वैध मानली जाऊ शकत नाही.

7 / 10
त्याचवेळी, मशीद व्यवस्थापन समितीने ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्यामार्फत दावा केला आहे की, शेकडो वर्षांपासून ज्ञानवापीमध्ये नमाज अदा केली जात आहे आणि लोक वूजू करत आहेत. यासोबतच त्यांनी वाजू खाईपर्यंत लोकांना जाऊ देण्याची परवानगी मागितली असून, शिवलिंग सापडल्यानंतर ते सील करण्याचे आदेश दिले आहेत.

8 / 10
हिंदू आपली बाजू मांडताना  सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, "मंदिराच्या जमिनीवर बांधलेली कोणतीही इमारत केवळ एक रचना असू शकते, तिला मशीद म्हणता येणार नाही." भगवान आदि विश्वेश्वर आजही त्या जमिनीचे मालक आहेत. ही जमीन कोणत्याही मुस्लिम, मुस्लिम संघटना किंवा वक्फ बोर्डाच्या मालकीची नाही.भविष्यात या खटल्याच्या सुनावणीसाठी हा युक्तिवाद मोठा आधार ठरू शकतो, असे मानले जात आहे

9 / 10
 हिंदू बाजूचा हा युक्तिवाद कोर्टात मान्य झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही 19  जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.