Tiware Dam breached : फुटलेल्या तिवरे धरणाचे फोटो

Tiware Dam breached : फुटलेल्या तिवरे धरणाचे फोटो

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

Tiware Dam Breached रत्नागिरी : कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जणांना वाहून नेले. सकाळी पावणे 10 पर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला.

धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

नेमकं काय घडलं?

कोकणसह राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाने कहर माजवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिवरे-खडपोली धरण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरलं.

आधीच धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. काही क्षणात धरणाला भगदाड पडलं आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती प्रशासनालाही दिली.

धोका नसल्याची माहिती खोटी ठरली

धरण फुटू शकते या भितीमुळे नागरिकांनी पाठबंधारे विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली.

त्यानंतर धरणाचे परीक्षण केल्यानंतर ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याचे पाठबंधारे विभागाने सांगितले. 

गावातील नागरिकांनी  तिवरे धरण हे 100 टक्क्यांपैकी केवळ 27.59 टक्केच भरले होते. त्यामुळे हे धरण गळतीमुळेच धरण फुटल्याचा आरोप केला आहे.

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं.

पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.  धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या धरणफुटीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्याला सुरुवात केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री साडेदहाच्या सुमारास रत्नागिरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकही घटनास्थळी रवाना झाले. याशिवाय प्रशासनाने रत्नागिरीसह एनडीआरएफच्या पुणे, सिंधुदुर्गातील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केलं.

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर आहे. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

More Photo Gallery