Vinayak Mete : विनायक मेटे अनंतात विलीन; कटुंबिय , कार्यकर्त्यांनी डबबलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडमध्ये त्यांचे हजारो चाहते आणि समर्थक उपस्थित होते. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते.

Aug 15, 2022 | 5:37 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 15, 2022 | 5:37 PM

मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रातील पुतळा या दोन मुद्द्यांवर आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारा मराठवड्यातील लढवय्या नेता अनंतात विलीन झालाय. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

1 / 7
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडमध्ये त्यांचे हजारो चाहते आणि समर्थक उपस्थित होते.   यावेळी   मंत्री अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित  होते

2 / 7

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. मराठा आरक्षणासंबंधित बैठकीसाठी येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा आघात केवळ मेटे कुटुंबावरच नाही तर संपूर्ण मराठा समाजावर आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला लढा वाया जाऊ देणार नाही. - मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे

3 / 7

विनायक मेटे यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मुंबई - पुणे महामार्गावर हा अपघात घडला. द मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी बीडमध्ये गर्दी केली होती

4 / 7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीडमध्ये येत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

5 / 7
विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या लाडक्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आज बीडमध्ये हजारो चाहते आणि कार्यकर्ते दाखल झाले होते  विनायक मेटे अमर रहे च्या घोषणा दिल्या

6 / 7
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर आज बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले होते

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें