Photo : लेकीचा चेहरा कधी दाखवणार, कोणत्या बोलरला घाबरतोस? चाहत्यांचे बेधडक प्रश्न, विराटची दिलखुलास उत्तरं!

कर्णधार विराट कोहली सहकारी खेळाडूंसोबत मुंबईत विलगीकरणात आहे. यावेळी त्याने मोकळ्या वेळेत चाहत्यांशी इन्स्टाग्रामवरुन संवाद साधला.

1/8
Virat Kohli Phone
भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) चाहत्यांशी ऑनलाईन गप्पागोष्टी करण्याचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना ही हेच हवं होतं. त्यांनीही लगेचच प्रश्नांची झुंबड उठवली.
2/8
virat
सर्वात आधी एका चाहत्याने 'तू आता नेमकं काय करत आहेस?' असं विचारल्यावर विराटने एका हातात कप घेतलेला सफेद टी-शर्टमधील फोटो शेअर केला.
3/8
Virat Kohli Celebration
त्यानंतर एकाने 'तू ट्रोर्लसला आणि मीम्सला कशी उत्तर देतोस?' असा प्रश्न विचारताच मी माझ्या बॅटने त्यांना उत्तर देतो. असे दर्शवणारा फोटो शेअर केला. हा फोटो विराटने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शतक ठोकलं होतं. तेव्हाचा आहे.
4/8
virat cr
एका चाहत्याने थेट विराटला त्याने गूगलवर सर्वात शेवटी काय सर्च केल आहे? असं विचारताच विराटने ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो ट्रान्सफर’ असं उत्तर दिलं. त्यामुळे विराट प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) भविष्यात कोणत्या संघात खेळू शकतो? याबाबत सर्च करत असल्याचं समोर आलं.
5/8
Virat-reply-Fans-Over-Vamika-Question
एकाने विराटला त्याच्या मुलीबाबत प्रश्न विचारत 'वामिका नावाचा अर्थ काय? तिचा चेहरा कधी दाखवणार?' असं विचारलं. त्यावेळी वामिका हे देवी दुर्गाचं दुसरं नाव आहे. तसंच'आम्ही नवरा बायकोने ठरवलंय (विराट-अनुष्का) की आपल्या लेकीला जोवर सोशल मीडिया काय हे कळत नाही तोवर तिचा फोटो आपण सोशल मीडियावर टाकायचा नाही. यासंदर्भातती स्वत:च तिचा निर्णय घेईल' असंही विराटन लिहल.
6/8
virat baby
विराटचा लहाणपणीचा फोटो? असा प्रश्न एका चाहत्याने करताच विराटने लहाणपणीचा एक क्यूट फोटो शेअर केला.
7/8
Virat-kohli-MS-Dhoni-relation-just-2-Word
त्यानंतर एकाने विराटला तुझं आणि माहीचं नातं केवळ दोन शब्दात सांग, असा अडचणीचा प्रश्न विचारला. पण विराटने तितक्याच खऱ्या मनाने उत्तर दिलं. ‘माझं आणि माहीचं नातं म्हणजे विश्वास आणि आदर…’ असं हृदय जिंकणारं उत्तर विराटने दिलं.
8/8
virat wasim akram
तसेच क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्या गोलंदाजाला खेळणं तुझ्यासाठी अवघड ठरलं असतं? या प्रश्नाला विराटन वसीम अक्रम असं उत्तर दिलं.