Marathi News » Photo gallery » Water scarcity in Nashik; Road blockade for water for women in Tiradshet village
Nashik Water scarcity: नाशिकमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ; तिरडशेत गावातील महिलांचे पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी टंचाईला कंटाळलेल्या तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता रोको करत आंदोलन केले. गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई असून प्रशासनांकडूनही याकडं दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात आजही दुष्काळजन्य परिस्थती डोके वर काढत आहे. अनेक गावांमधीलमहिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असलेली दिसून येत आहे. अनेकदा हंडाभर पाण्यासाठी महिला आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरल्याचे समोर आले आहे.
1 / 5
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी टंचाईला कंटाळलेल्या तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता रोको करत आंदोलन केले. गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई असून प्रशासनांकडूनही याकडं दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी प्रशासनाच्या निष्काळजी पणाचा निषेधही व्यक्त करत केला.
2 / 5
महिलांच्या या आंदोलनाबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, म्हणाले की जलजीवन अभियानांतर्गत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील गावांचे आम्ही चिन्हांकित करत आहोत. पाणीपुरवठ्याशी संबंधित काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. आम्ही गावकऱ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे
3 / 5
गावात बहुतांश मजूर लोक राहतात. रोज मजुरीला जातात, मात्र पाण्याची सोय नाही.त्यामळे आपल्याला कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण करावी लागते, असे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे
4 / 5
तिरडशेत गाव नाशिक शहराच्या जवळ आहे . मात्र गेल्या ५० वर्षांपासून या गावात पाणी टंचाईची समस्या सुरु आहे. ती अद्याप सुटलेली नाही .