ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी
राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
18:22 PM, 21 Dec 2019
ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ (farm loan waiver Maharashtra) करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत
शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील
कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही.
ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल