PHOTO : गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे शुक्रवारी (17 जानेवारी) निधन (world smallest person death) झाले. निमोनिया या आजारामुळे थापाचे निधन झाले.

  • Updated On - 8:05 pm, Sun, 19 January 20 Edited By:
1/5
जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे शुक्रवारी (17 जानेवारी) निधन झाले. निमोनिया या आजारामुळे थापाचे निधन झाले. जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून 27 वर्षाच्या थापाला वर्ष 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याची उंची 26.3 इंच होती. तसेच वजन 6 किलो होते.
2/5
थापा नेपाळचा राहणार होता. खगेंद्र थापाचा जन्म 14 ऑक्टोबर 1992 रोजी काठमांडूपासून 200 किलोमीटरपासून लांब असलेल्या पोखरा येथे झाला होता.
3/5
थापाला 2010 मध्ये 18 वर्षामध्ये जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. एक वर्षानंतर थापाकडून फिलीपींसच्या जनरे बालाविंगने सर्वात कमी उंचीचा अवॉर्ड आपल्या नावावर करुन घेतला.
4/5
"खगेंद्रची उंची एवढी कमी होती की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा तो एका हातात सामावून जायचा", असं त्याचे वडील रुप बहादूर यांनी सांगितले.
5/5
खगेंद्रला निमोनिया झाला होता. त्यामुळे त्याला पोखराच्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारा दरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.