
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे चढऊतार चालू आहेत. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. पण दिवाळीपूर्वी हेच सोनं चांगलंच चकाकलं होतं.

दरम्यान, सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोनं, सोन्याचे नाणे, सोन्याचे बिस्कीट किंवा सोन्याचे दागिने तयार करतात. एकदा दागिने केले की ते तिजोरीत सुरक्षितपणे ठेवून दिले जातात.

मात्र तिजोरीत ठेवून दिलेल्या याच दागिन्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. गोल्ड लिजिंग, गोल्ड मोनिटायझेशन स्कीमचा वापर करून तुम्ही तुमच्या सोन्याच्या मदतीने भरपूर पैसे कमवू शकता.

गोल्ड लिजिंगमध्ये तुम्ही तुमचे सोने किरायाने घेतले जाते. म्हणजेच एका निश्चित काळासाठी तुम्ही सोने देऊन तुम्ही त्यावर पैसे कमवू शकता. यासाठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या योजनेत ज्वेलर्स तुम्ही भाड्याने दिलेल्या सोन्यावर तुम्हाला दोन ते पाच टक्क्यांनी रिटर्न्स देतात.

गोल्ड मॉनिटायझेसन स्कीममध्ये तुम्ही तुमचे सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकता. बँक लॉकरमध्ये सोने ठेवल्यास बँक तुम्हाला तुमच्या सोन्यावर 2.25% ते 2.5 टक्क्यांपर्यंत व्याज देते. या मार्गांनी तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या मदतीने पैसे कमवू शकता.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)