Marathi News » Photo gallery » You like to eat sweets; But are you afraid of gaining weight? Don't worry, include 'these' five foods in your diet
तुम्हाला गोड खायला आवडते; पण वजन वाढण्याची भीती आहे?, काळजी करू नका आहारात करा ‘या’ पाच पदार्थांचा समावेश
सामान्यपने अधिक गोड पादार्थ खाल्यास मधुमेहाचा धोका वाढतो, तसेच तुम्हाला भविष्यात लठ्ठपणाचा त्रास देखील होतो. अनेकांना गोड पदार्थ आवडत असतात. मात्र भविष्यात होणाऱ्या त्रासांची चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे असे व्यक्ती शक्यतो गोड पदार्थ खायचे टाळतात. मात्र असेही काही गोड पदार्थ आहेत. ज्याच्या सेवनामुळे तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर राहू शकता. तसेच तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीत देखील विशेष असा फरक पडत नाही. आज आपण अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.
मध लावलेले बदाम : मधाची ही विशेषता आहे की, मधामुळे तुमचे वजन कधीही वाढत नाही. तसेच तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होते. सोबतच बदाम देखील आरोग्याला चांगले असतात. त्यामुळे जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही मध लावलेले बदाम खाऊ शकता.
1 / 5
सुखवलेल्या फळांचे काप : फळांना सुखवल्यास त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. तसेच अशी फळे खाण्यासाठी देखील स्वदिष्ट असतात. त्याममध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे असतात.
2 / 5
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटच्या सेवनाने देखील तुमच्या शरीरामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते. तुम्हाला जर चॉकलेट खाण्याची आवड असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. या चॉकलेट सेवनाचा मुख्य फायदा म्हणजे तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर राहाता.
3 / 5
बटर : तुम्ही यासोबत बदाम कुकीज खाऊ शकता. असे मानले जाते की बटर आणि बदाम कुकीज एका ठराविक मर्यादेपर्यंत खाल्ल्यास शरीरासाठी चांगेले असते.
4 / 5
भाज्यांपासून बनवलेले चिप्स: जर तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले चिप्स घरच्या घरी तयार करून, ते पण खाऊ शकता. सर्वप्रथम वेगवेगळ्या भाज्यांचे छोटे-छोटे काप तयार करा आणि ते बेक करा. तुमचे चिप्स तयार. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डायट प्लॅन ठरवताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.