चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी

आमदार निधीतून 350 कोटी आपण महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.ajit pawar 350 crore MLA fund

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 19:12 PM, 16 Apr 2021
चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी
अजित पवार

पुणेः आमदार निधीतून 350 कोटी आपण महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( ajit pawar) यांनी दिलीय. आमदार निधी खर्च करण्यासंदर्भात चर्चा झाली, 4 कोटींपैकी 1 कोटी कोरोनावर खर्च करण्याची आमदारांना परवानगी दिली आहे, असंही त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. (350 crore from MLA fund will be spent on corona in Maharashtra says ajit pawar)

राज्यात कोरोनाचे संकट वाढले: अजित पवार

राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. पुढच्या काळात रुग्ण वाढले तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स आणि रेमडेसिवीर चर्चा झालीय. रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींसोबत मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबाबत चर्चा केलीय, व्हेंटिलेटरसंदर्भात प्रकाश जावेडकर यांच्याशी चर्चा केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय.

डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अजितदादांचं आवाहन

सोमवारी विभागीय आयुक्तांना ससूनच्या डॉक्टरासंदर्भात बैठक घेण्यास सांगितली आहे. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्य करावे, असंही अजित पवार म्हणालेत. सरकार म्हणून काम करणारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारण न आणता कोरोनाबाधितांचा जीव जाणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीसंदर्भात परवानगी दिलेली आहे. सर्वाना रेमडेसिवीर देण्याची गरज नाहीये, असंही अजित पवार म्हणालेत.

“आरोग्य व्यवस्था कोलमडलेली नाही”

अजित पवार म्हणाले, “आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे हे म्हणणं चूक. तसं काहीही घडलेलं नाही. आरोग्य यंत्रणा मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ जीवाचं रान करतेय. पोलीस राबतायेत, डॉक्टर्स राबतायेत. नव्याने पुण्यात 900 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलीय. त्यांना भरती करण्याचे अधिकार देण्यात आलेत. प्रातांना चतुर्थ आणि तृतीय श्रेणी स्टाफ भरण्याची परवानगी दिलीय. एमबीबीएस डॉक्टर जेवढे मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाहीये. त्याबद्दलचं कारण मी वैद्यकीय तज्ज्ञांना विचारलं. त्यांनी सांगितलेली कारणं योग्य असतील तर सरकार त्यात जरुर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.”

“कुंभमेळा, निवडणुका यामुळे देशभरातच कोरोना वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. कर्नाटक, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. अनेक वरिष्ठांना कोरोना झालाय. यावेळचा कोरोना आजूबाजूच्या लोकांना लवकर बाधित करतोय. त्यामुळे कुटुंबंच्या कुटुंब बाधित होत आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं. 350 crore from MLA fund will be spent on corona in Maharashtra says ajit pawar

 संबंधित बातम्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

केंद्र सरकारकडे भरपूर व्हेंटिलेटर, एकाही राज्याकडून मागणी नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

350 crore from MLA fund will be spent on corona in Maharashtra says ajit pawar