नालासोपाऱ्यात ऑक्सिजनअभावी 62 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आरोप, सोमय्यांची मानवाधिकार आयोगाकडे याचिका

हे मृत्यू नव्हे तर क्रिमिनल निगलिजन्स असल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या आणि वसई विरार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी आज महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:38 PM, 16 Apr 2021
नालासोपाऱ्यात ऑक्सिजनअभावी 62 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आरोप, सोमय्यांची मानवाधिकार आयोगाकडे याचिका
kirit somaiya

वसईः नालासोपाऱ्यात ऑक्सिजनअभावी 62 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू (corona death) झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. 12 आणि 13 एप्रिल रोजी ऑक्सिजन तुटवड्यामुळे (lack of oxygen) नालासोपाऱ्यात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, पण महापालिकेने आणि राज्याच्या आरोग्य सचिवांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, हे मृत्यू नव्हे तर क्रिमिनल निगलिजन्स असल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) आणि वसई विरार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक (rajan naik) यांनी आज महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केलीय. (62 corona victims die due to lack of oxygen in Nalasopara, kirit Somaiya petition to Human Rights Commission)

या याचिकेत 66 कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे दाखलेसुद्धा जोडलेत

या याचिकेत 66 कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे दाखलेसुद्धा जोडलेत. 1 ते 13 एप्रिलदरम्यान प्रत्यक्षात 201 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले, पण महापालिकेने फक्त 23 मृत्यू दाखवले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी याचिकेत केलाय. मानवाधिकारकडे दाखल केलेल्या याचिकेत नालासोपाऱ्याप्रमाणे ठाणे महापालिकेतही असेच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय.

13 दिवसांत 201 कोरोना रुग्णांचे मृत्यू

परंतु खरं तर 13 दिवसांत 201 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेत. तर याचिकेत महाराष्ट्र सरकारचे आरोग्य सचिव, वसई-विरार महापालिका आयुक्त, ठाणे महापालिका आयुक्त तसेच 23 खासगी हॉस्पिटल्सना प्रतिवादी करण्यात आलेय.

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोप फेटाळले

पण किरीट सोमया यांचे सर्व आरोप वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावलेत. नालासोपाऱ्यात झालेले रुग्णाचे मृत्यू हे ऑक्सिजनअभावी नाही, तर त्यांच्या क्रिटिकल परिस्थितीमुळे झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले. 62 corona victims die due to lack of oxygen in Nalasopara, kirit Somaiya petition to Human Rights Commission

संबंधित बातम्या

धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू

उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली! एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत

62 corona victims die due to lack of oxygen in Nalasopara, kirit Somaiya petition to Human Rights Commission