Islampur : इस्लामपूर शहरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांची उपस्थिती

आपला गौरवशाली इतिहास विकासाची साक्ष देतो. तो जपण्याची आणि अधिक समृध्द करण्याची जबबादारी आपली आहे, असं आवाहन ही जयंत पाटील यांनी केले.

Islampur : इस्लामपूर शहरात  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  भव्य मशाल रॅलीचे आयोजन, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांची उपस्थिती
Islampur : इस्लामपूर शहरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांची उपस्थिती
Image Credit source: tv9marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 16, 2022 | 4:56 PM

सांगली – जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) शहरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि युवा नेते प्रतीक जयंत पाटील (Pratik Patil) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात सगळीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत 700 मशाली सह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय असा जयघोष करीत देशभक्ती पर घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमा दरम्यान शिराळा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी काल सजवलेली बस चालवल्याची अद्याप चर्चा आहे.

जगातील सर्व धोरणांचा अभ्यास करून त्यांचा स्वीकार केला

स्वातंत्र्योत्तर काळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगातील सर्व धोरणांचा अभ्यास करून त्यांचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या घटनेने लोकशाहीची पाळेमुळे घट्ट झाली. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली, असं मत ही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला. जयंत पाटील यांनी अडीच वर्षे मंत्री असताना चांगलं काम केल्याची देखील चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

आपला गौरवशाली इतिहास विकासाची साक्ष देतो

आपला गौरवशाली इतिहास विकासाची साक्ष देतो. तो जपण्याची आणि अधिक समृध्द करण्याची जबबादारी आपली आहे, असं आवाहन ही जयंत पाटील यांनी केले. कोणत्यातरी समूहाचा द्वेष करण्याची बळावत चाललेली मानसिकता ही देशाच्या प्रगतीसाठी साठी धोक्याची घंटा आहे, अशी चिंता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधकांनी त्यांच्यावरती ईडीची कारवाई केली असल्याचे जयंत पाटील यांनी अनेकदा सांगितलं आहे. काल कार्यक्रमात देखील जयंत पाटील केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरती टीका केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें