Vidhan Parishad Election Result : राजकारणातील नवा इतिहास, चार भाऊ एकाच वेळी आमदार!

Vidhan Parishad Election Result : राजकारणातील नवा इतिहास, चार भाऊ एकाच वेळी आमदार!
बेळगाव

विधान परिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election Result) आज (मंगळवार, १२ नोव्हेंबर २१) जाहीर झालेत. यात काँग्रेस(Congress)चे सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) तसेच रमेश व भालचंद्र जारकीहोळी असे चौघे आमदार झालेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 14, 2021 | 9:57 PM

बेळगाव : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election Result) आज (मंगळवार, 12 नोव्हेंबर 21) जाहीर झालेत. निवडणुकीतील निकालांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असतानाच, यामध्ये प्रामुख्यानं बेळगावा(Belgaum)त विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच याच जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी(BJP)चे सर्वाधिक आमदार असल्यामुळे सार्‍यांच्या नजरा निवडणूक निकालाकडे खिळून राहिल्या होत्या.

यावेळी दाखवला करिष्मा
नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीला हादरा देत काँग्रेस(Congress)चे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) यांनी विधानपरिषद निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मतं प्राप्त केली आहेत. याचवेळी कर्नाटक(Karnataka)च्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या जारकीहोळी बंधूंनी या वेळीही आपला करिष्मा दाखवला आहे.

दुसऱ्या क्रमांकाची मतं
लखन जारकीहोळी (Lakhan Jarkiholi) दुसर्‍या क्रमांकाची मतं मिळवून आमदार होत आहेत. लखन जारकीहोळी आमदार झाल्यामुळे जारकीहोळी कुटुंबातले तब्बल चार बंधू म्हणजेच सतिश, रमेश, भालचंद्र आणि लखन एकाच वेळी आमदार बनण्याचा ऐतिहासिक योग आलाय.

काँग्रेस-भाजपा
अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी (Lakhan Jarkiholi) विजयी झालेत. त्यामुळे एकाच घरात चार आमदार असा योग आलाय. सतीश जारकीहोळी काँग्रेश तर भाजपामधील रमेश व भालचंद्र जारकीहोळी हे आमदार आहेत.

Raj Thackeray : म्हणावं इतकं काम झालं नाही? भाजपासोबत बोलणी होतेय? राज ठाकरे म्हणाले…

Maharashtra Vidhan Parishad Election Result: विधान परिषद निवडणूक भाजप जिंकली, पण घोडेबाजारही झाला, नवाब मलिकांचा आरोप

मी दिल्लीतच बसलोय, येताय तर या, दिल्लीतही शिवसेना आहे; संजय राऊतांनी ललकारले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें