पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीतील 8 जण पॉझिटिव्ह आलेत, अजून किती जण पॉझिटिव्ह आहेत, याचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.

  • विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम
  • Published On - 17:33 PM, 25 Feb 2021
पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह
संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही शिवसैनिक हजर नव्हता.

वाशिमः टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)हे 23 तारखेला पोहरादेवी येथे दाखल झाले. पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही नाराजी व्यक्त केलीय. परंतु आता त्या गर्दीनंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीतील 8 जण पॉझिटिव्ह आलेत, अजून किती जण पॉझिटिव्ह आहेत, याचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. (After Sanjay Rathod show of strength in Pohardevi, 8 people including Mahanta are positive)

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने पोहरादेवीला आल्यामुळं कोरोना वाढणार ही भीती होती आणि तेच खरे ठरलं आहे. दरम्यान 22 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत कबिरदास महाराजसह यांच्या कुटुंबातील 4 जणांसह आज 8 जण पॉझिटिव्ह आलेत.

महंत कबिरदास महाराज यांच्यासह 8 जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने पोहरादेवी येथील महंताला नोटीस दिल्या होत्या, मात्र तरीही संजय राठोड समर्थकांनी एकच गर्दी केली होती. त्यामध्ये आज महंत कबिरदास महाराज यांच्यासह 8 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळं वनमंत्री संजय राठोड यांनी कबिरदास महाराज यांच दर्शन घेतले होते. त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून, गावात कोरोना टेस्ट सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर यांनी दिलीय.

पोहरादेवी गर्दीप्रकरणी 8 ते 10 हजार लोकांवर गुन्हे दाखल

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आणि कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील गर्दीप्रकरणी निष्पन्न झालेल्या 10 जणांसह 8 ते 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या मानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच पोहरादेवी येथील महंतांना मानोरा पोलिसांनी नोटीस बजावली होती. वनमंत्री संजय राठोडांवर गुन्हे दाखल मागणी होत आहेत? कोण काय मागणी करत आहेत हा माझा विषय नाही, तपास सुरू असल्याचे वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

After Sanjay Rathod show of strength in Pohardevi, 8 people including Mahanta are positive