महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस

भाजपचा बहुमत चाचणीत पराभव करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांना आम्ही पराभूत करु, असं अहमद पटेल म्हणाले.

Ahmed Patel Congress  press conference, महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर तिकडे काँग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद (Ahmed Patel Congress  press conference) घेऊन आपली भूमिका मांडली. काँग्रेसचे केंद्रातील नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. काँग्रेस नेते अहमद पटेल (Ahmed Patel Congress  press conference) यांनी भाजपवर सडकून टीका केली.

तुम्हाला माहिती आहे आज सकाळी सकाळी बँड, बाजा, बारात यांच्याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. याची नोंद महाराष्ट्रात काळ्या शाईने नोंदवली जाईल, असं अहमद पटेल म्हणाले.

राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं मात्र, काँग्रेसला संधी दिली नाही. ज्याप्रकारे त्यांनी खातरजमा न करता त्यांनी एका नेत्याने दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे शपथ दिली. यातून चुकीचं झालं असल्याचं स्पष्ट आहे.

हा प्रकार संविधानाला पायदळी तोडण्याचा प्रकार आहे. आम्ही याचा निषेध करतो. ज्या प्रक्रियेद्वारे व्हायला हवे होते, ते होणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. शरद पवार यांच्याशी चर्चा करुन देखील निश्चित केले. काल आम्ही बैठक घेतली, त्या दोन तीन मुद्दे बाकी होते, त्यासाठी आम्ही आज सकाळी भेटून चर्चा करणार होतो. मात्र, त्याआधीच हे कांड झालं. त्याचा जितका निषेध करावा तो कमी आहे.

शरद पवार यांनी ज्या ज्या तारखा दिल्या त्या त्या तारखेला आम्ही आलो आणि बैठकांमध्ये सहभागी झालो. काँग्रेसने अजिबात उशीर केला नाही. आज जे झालं ते राष्ट्रवादीतून काही लोक फुटल्याने झालं.

भाजपचा बहुमत चाचणीत पराभव करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांना आम्ही पराभूत करु, असं अहमद पटेल म्हणाले.

आम्ही सकाळपासून जे बोललो त्याप्रमाणे सायंकाळच्या बैठकीत संबंधित नेत्यांवर कारवाईचा किंवा दुसरा नेता ठरवण्याचा निर्णय होईल. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ दोन गावाकडे आहेत. सर्व आमदार एकजूट असून भाजपला पराभूत करण्यासाठी तयार आहेत. राजकीय आणि कायदेशीर दोन्ही मार्गांनी आम्ही भाजपला उत्तर देऊ. दोन्ही आघाड्यांवर आम्ही काम करु, असंही अहमद पटेल यांनी ठणकावलं.

संविधानाचे जी मूल्ये आहेत त्यावर आम्हाला सहमती घ्यायची होती. त्यावर शिवसेनेने सहमती दिली आहे. त्यामुळे आता आम्ही सोबत आहोत, वेगळं असण्याचा कोणताही प्रश्न शिल्लक नाही.

संजय निरुपम व्यक्ती म्हणून काही मतं व्यक्त करत असतील तर त्यावर मी बोलणार नाही. आम्ही पक्ष म्हणून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जर काँग्रेसला जर कारवाई करण्याची आवश्यकता वाटली तर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असं अहमद पटेल म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *