‘मोदीमुक्त भारत’ म्हणणाऱ्यांबरोबर युती हा लव्ह जिहादच असल्याचा घणाघातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. (Alliance With Those Who Say ‘Modi-Free India’ Is Love Jihad; Uddhav Thackeray Criticize)
मुंबईः बिहारमध्ये ‘संघमुक्त भारत’ म्हणणाऱ्या नितीशकुमारांसोबत तुम्ही युती केलीत, तो भगवा कोणता आहे तुमचा?, आधी भगवा आहे का तुमच्याकडे? असा हल्लाबोल करत ‘मोदीमुक्त भारत’ म्हणणाऱ्यांबरोबर युती हा लव्ह जिहादच असल्याचा घणाघातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. (Alliance With Those Who Say ‘Modi-Free India’ Is Love Jihad; Uddhav Thackeray Criticize)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दैनिक ‘सामना’साठी मुलाखत दिली. लव्ह जिहाद राजकारणात का नसावं?, लव्ह जिहादचं राजकारण हा भाग वेगळा आहे. पण लव्ह जिहाद म्हणजे काय?, मुस्लिम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. नितीशकुमारांबरोबर कशी चालली? चंद्राबाबूंसोबत कशी चालली? ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या. त्यात भिन्न विचारांचे पक्ष तुम्ही एकत्र येऊन युती चालते हे लव्ह जिहाद नाही? आहेच ना?, असं टीकास्त्रही उद्धव ठाकरेंनी सोडलं आहे.
गोध्रा दंगलीनंतर रामविलास पासवान यांनी मोदींवर टीका करून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात. हे राजकीय लव्ह जिहाद नाही? आणि वापरून पुन्हा सोडून देणं. म्हणजे तलाक केलाच ना तुम्ही राजकारणातसुद्धा! पण महाराष्ट्रात लव्ह जिहाद आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात बहुमताचं सरकार काम करत असताना राजभवनामध्ये समांतर सरकार चालू आहे, त्यावरही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना छेडले. राऊतांचा हा प्रश्न येताच मुख्यमंत्र्यांनी जाऊ द्या हो, करू दे हो… करू दे त्यांना मजा, असं म्हणत या प्रश्नावर अधिक भाष्य करणं टाळलं. (Alliance With Those Who Say ‘Modi-Free India’ Is Love Jihad; Uddhav Thackeray Criticize)
मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असं त्यांनी विरोधकांना ठणकावलं.
तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असा इशाराही त्यांनी दिला. सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
माझ्या दसऱ्याच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असा इशारा देतानाच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “अभिनंदन मुलाखत” LIVE https://t.co/3eYkQ8mowc
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(Alliance With Those Who Say ‘Modi-Free India’ Is Love Jihad; Uddhav Thackeray Criticize)
संबंधित बातम्या:
भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला