शिवसैनिक कुठे आहेत त्यांनी पुढं यावं, अशोक चव्हाणांची साद; शिवसैनिकांकडूनही महाविकास आघाडीच्या एकीचं दर्शन

महाविकास आघाडी सरकराचं नेतृत्त्व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं ते राज्य चालवत आहेत.

शिवसैनिक कुठे आहेत त्यांनी पुढं यावं, अशोक चव्हाणांची साद; शिवसैनिकांकडूनही महाविकास आघाडीच्या एकीचं दर्शन
नांदेडमध्ये शिवसैनिकांच्या हस्ते भूमिपूजन
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 6:57 AM

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9, मराठी, नांदेड: राज्यात 2019 मध्ये शिवसेना, (Shivsena) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकराचं नेतृत्त्व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं ते राज्य चालवत आहेत. वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांचं असल्यानं महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयमानं जुळवून घेत राज्य सरकारचं कामकाज सुरु ठेवलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकासआघाडी स्थानिक पातळीवर देखील मजबूत करायची असल्याचं कृतीतून दाखवून दिलंय. भोकर मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अशोक चव्हाणांनी मोठ्या मनानं शिवसैनिकांना साद घातली. शिवसैनिकांनी देखील अशोक चव्हाणांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अखेर, त्या विकासकामाचं भूमिपूजन शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आलं. महाविकास आघाडी आता स्थानिक पातळीवर मजबूत होत असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं.

अशोक चव्हाणांची शिवसैनिकांना साद

पाळज येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काल अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, सुभाष नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रात आपली महाविकास आघाडी आहे. मग शिव सैनिकांनी मागे राहू नये, असं आवाहन केलं. मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.

भोकर मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आलं.. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसैनिकांना जय महाराष्ट्र करत साद दिली.नगर पंचायत निवडणूक निकलानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यामध्ये काही जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी मजबूत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे. शिवसैनिकांनी देखील मंत्री चव्हाण यांच्या शब्दाला मान देत पुढं येऊन विकासकामांचे नारळ फोडले.

अखेर शिवसैनिकांनी देखील अशोक चव्हाणांचा मान राखला

अशोक चव्हाण यांनी शिवसैनिकांना पुढं येऊन भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचं आवाहन केलं. अखेर शिवसैनिकांनी देखील अशोक चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला जय महाराष्ट्र म्हणत मान राखला. माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, सुभाष नाईक यांच्यासह शिवसैनिकांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

इतर बातम्या:

Video | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट! ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं?

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, थोडक्यात निभावलं! नेमकं काय घडलं?

Ashok Chavan appeal to Shivsena party workers to came forward for stone stepping ceremony

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.