क्लिप जाहीर केली तर… आशिष शेलार यांचा अशोक चव्हाण यांना इशारा

अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांना इशारा दिला आहे.

क्लिप जाहीर केली तर... आशिष शेलार यांचा अशोक चव्हाण यांना इशारा
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 5:10 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांना इशारा दिला आहे.

2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. असे असताना सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता असं म्हणत अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांचे देखील नाव घेतले.

सत्ता स्थापनेबाबातच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याबाबत सुचवलं होतं असेही चव्हाण म्हणाले.

2015-2019 या काळात राज्यात युतीचे सरकार होते. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरु होती. युती असतानाही शिवसेना आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. यामुळेच शिवसेनेने काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव मांडल्याचा दावा देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसह युतीचा केल्याचे बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर त्यांची अडचण होईल असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

मात्र, अशोक चव्हाण हे आमचे मित्र आहेत. त्यांना अडचणीत आणावे असे आम्हाला वाटत नाही. कोणतीही वैयक्तीक टीका आम्ही करणार नाही. मात्र, राजकीय घडामोडींवर आम्ही टीका करु असे शेलार म्हणाले.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.