अधिकाऱ्यांना उलटं टांगण्याची धमकी; बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल Babanrao Lonikar Alleged Audio Clip Viral On Social Media

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, जालना
  • Published On - 15:10 PM, 29 Nov 2020
अधिकाऱ्यांना उलटं टांगण्याची धमकी; बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना: भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. (Babanrao Lonikar Alleged Audio Clip Viral On Social Media)

पोलिसांना दमदाटी करताना या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विधानसभेत उलटं टांगण्याची भाषा वापरली. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. पण या ऑडिओ क्लिपसंदर्भात अद्यापही खातरजमा झालेली नाही. एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरावर कारण नसताना धाड का टाकता, तुमच्याकडे कोर्टाची परवानगी होती का, असा सवालही या कथित ऑडिओ क्लिपमधून लोणीकर विचारत असल्याचं प्रत्यक्षदर्शी दिसून येतंय. याबाबत बबनराव लोणीकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितली. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया लोणीकर यांनी दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना उलटं टांगून मारण्याची भाषा करत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गोहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकासह हसन गोहर यांनी त्या व्यापाऱ्यांच्या घरात धाड टाकली.

मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आलं नाही. लोणीकरांचा परतूर हा मतदारसंघ आहे. व्यापारीसुद्धा परतूर मतदारसंघातला असल्यानं त्या व्यापाऱ्याने लोणीकरांपुढं ही कैफियत मांडली आणि लोणीकर यांचा चांगलाच पारा चढला. त्यानंतर परतूरचे एपीआय रवींद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगून मारू, अशी धमकी देण्यात आली. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

(Babanrao Lonikar Alleged Audio Clip Viral On Social Media)

संबंधित बातम्या

वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार; बबनराव लोणीकर संतापले

पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, राज्य सरकारचे आरटीपीसीआर किट बोगस : बबनराव लोणीकर