बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

मुंबईः बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. (Sanjay Raut On Thackeray Government)

युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोदींनीही लक्ष घालावं, यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा, आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ. चंद्रकांत पाटलाचे सरकार राहिले नाही, तर त्यांना पण अभ्यास करता आला असता, असा टोलाही संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांचा राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होतेय, बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलंय, बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही, तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही. मधला काळ हा संकटाचा होता, कोरोनाची लढाई उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केल्याचाही संजय राऊतांनी उल्लेख केला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र, कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *