धनंजय मुंडेंचा दणका, बीड झेडपीत महाविकासआघाडीचा झेंडा

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात (beed zilla parishad election) आली आहे.

beed zilla parishad election, धनंजय मुंडेंचा दणका, बीड झेडपीत महाविकासआघाडीचा झेंडा

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात (beed zilla parishad election) आली आहे. बीडमध्ये 58 पैकी 32 मतं महाविकासआघाडीला तर 21 मतं भाजपला मिळाली. तर यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीच्या शिवकन्या सिरसाठ या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. या निकालामुळे धनंजय मुंडे यांनी विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारल्याचं दिसत (beed zilla parishad election) आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षसाठी आज (4 जानेवारी) निवडणूक पार पडली. यात महाविकासआघाडीला 32 मतं मिळाली. तर भाजपला 21 मतं मिळाली. यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले. हायकोर्टाच्या आदेशामुळे हा निकाल 13 जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला होता. ‘लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं (beed zilla parishad election) होतं.

आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याची कबुली खुद्द भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी दिली आहे. परळी विधानसभेपाठोपाठ बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.

पंकजा मुंडे या सध्या परदेशात आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेंटेंनी आपल्या सदस्यांना व्हीप (beed zilla parishad election) बजावला.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची टक्कर होत असताना, बीडच्या नेत्या पंकजा मुंडे परदेशात असल्याने त्यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे नाहीत.  नेमकं याचवेळी परदेश दौऱ्याने मतदारसंघात (beed zilla parishad election) कुजबूज सुरु आहे.

अडीच वर्षांपूर्वी काय झालं होतं ?

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी सत्ताचक्र फिरवत सत्ता स्थापन केली. मात्र यंदा ऐन निवडणुकीत त्या परदेशात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचे बोललं जातं.

गेल्यावेळी सुरेश धस गटाचे राष्ट्रवादीचे 7 सदस्य भाजपला येऊन मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं. यानतंर सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अडीच वर्षांपूर्वी भाजप, शिवसेना, शिवसंग्राम यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.

बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल –

  • राष्ट्रवादी काँग्रेस – १९
  • काँग्रेस – ३
  • भाजपा – १९
  • शिवसेना – ४
  • काकू – नाना आघाडी – २
  • अपक्ष – २
  • शिवसंग्राम – ४ ( मात्र सर्व सदस्य भाजपवासी झालेत)

संबंधित बातम्या : 

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंना पराभव मान्य

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक : पंकजा मुंडे परदेशात, प्रीतम मुंडेंवर जबाबदारी

बीड झेडपीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *