आधी राणेंनी खडा टाकला, आता शेलारांनी शिंदेंच्या ‘त्या’ गोष्टीवर बोट ठेवलं, वाचा नेमकं काय घडतंय?

एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमाका उडवून दिला आहे. राणेंच्या या विधानावर चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनीही मोठं विधान केलं आहे. (ashish shelar)

आधी राणेंनी खडा टाकला, आता शेलारांनी शिंदेंच्या 'त्या' गोष्टीवर बोट ठेवलं, वाचा नेमकं काय घडतंय?
ashish shelar
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 3:21 PM

मुंबई: एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमाका उडवून दिला आहे. राणेंच्या या विधानावर चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनीही मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bjp leader ashish shelar reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. पण त्या नगर विकास खात्यात सुनियोजितपणा नाही. पर्यावरण मंत्री सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेताना आम्हाला दिसतंय. सध्या सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे, असं सांगतनाच एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं शेलार म्हणाले.

काँग्रेसला रोज लाथांचा मार

यावेळी त्यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. या कॅबिनेटमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यांना रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही. मिळेत तेव्हा लाथा मारण्याचं काम राष्ट्रवादीने सुरू ठेवलं आहे. त्यांचा समन्वयाशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचा विचका करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

तो सुसंस्कृत राजकारणाचा भाग

नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर भेटीवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या कार्यकर्त्यांनी लढा दिला आहे. त्या विभागात आमचे कार्यकर्ते पाय रोवून होते. त्यांच्या भावनांचा आम्ही सन्मान करतो. पण राजकारणाच्या पलिकडे जाऊनही काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहता कामा नये. राणेंनी जे केलं तो सुसंस्कृत राजकारणाचा भाग होता, असं ते म्हणाले. (bjp leader ashish shelar reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

संबंधित बातम्या:

राणेंच्या ‘त्या’ विधानाचा एकनाथ शिंदेकडून समाचार; म्हणाले, त्यात तथ्य नाही, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

तर एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ, ते शिवसेनेत कंटाळलेत, नारायण राणेंचा मोठा दावा

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

(bjp leader ashish shelar reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.