Devendra Fadnavis : दुनिया के सारे शौक पाले नही जाते… देवेंद्र फडणवीसांचे शायरीतून शरसंधान, टीकाकारांनाही माफी

'हर एक का मौका आता है...,' अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी अधिवेशनात फडणवीस यांच्या शेरोशायरीनं अवघ्या सभागृहाचं लक्ष वेधलं गेलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना माफही केलं.

Devendra Fadnavis : दुनिया के सारे शौक पाले नही जाते... देवेंद्र फडणवीसांचे शायरीतून शरसंधान, टीकाकारांनाही माफी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:39 PM

मुंबई : ‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता,’ या शायरीतून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनातून टीकास्त्र सोडलं. अवघ्या सभागृहाचं लक्ष या शायरीनं वेधलं गेलं. हे चित्र अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचं. आज एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadnavis)  सरकारची बहुमत चाचणी झाली. यावेळी बहुमतापेक्षा मोठा आकडा या नव्या सरकारनं गाठला आणि सभागृहातील आपलं वजन यानिमित्तानं दाखववून दिलं. दरम्यान, हर एक का मौका आता है…,’ अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना माफही केलं. तर बहुमत असूनही विरोधी बाकावर बसल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शायरी मात्र चर्चेत राहिली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत?

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते. ‘

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शायरी म्हटली,

‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता’

….उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेल्या हर एक का मौका आता है…,’ या शायरीतून संसदेत शेरोशायरी करणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांची आठवणी होते.

यानिमित्तानं दिग्गज नेत्यांची आठवण

आपण राज्यासह देशाच्या इतिहासात देखील आतापर्यंत अनेक दिग्गज नेते पाहिले असतील. ज्यांनी आपल्या शेरोशायरीनं सभागृहाचं वातावरण हसत खेळत ठेवलं. तर कुणी त्याच शेरोशायरीच्या माध्यमातून टीकाही केली. इतिहास बघितल्यास माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेत केलेली शेरोशायरी आणि गाजवलेलं सभागृह आजही आठवलं जातं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.